Ad will apear here
Next
‘महात्मा’


गेल्या शतकातील जगाचे तीन शिल्पकार - लेनिन, माओ-त्से-तुंग व महात्मा गांधी! त्यातील महात्माजी १९४८ साली आजच्याच दिवशी (३० जानेवारीला), कट्टर धर्मनिष्ठा व राष्ट्रवादाने भारावलेल्या नथुराम गोडसेच्या गोळीची शिकार झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांतच भारतीयांनी ‘राष्ट्रपिता’च गमावला. महात्माजींनी आयुष्यभर अहिंसेचा पुरस्कार केला; पण त्यांचीच अखेर हिंसेमुळे झाली, हा दैवदुर्विलास!



गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना ‘महात्मा’ म्हणून गौरवले, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४४मध्ये त्यांचे वर्णन ‘राष्ट्रपिता’ अशा शब्दांत केले.

बापूजींचे कार्य, विचार व कारकीर्द याविषयी बरेच काही लिहिता-बोलता येईल. पाकिस्तानच्या निर्मितीला त्यांनी दिलेल्या संमतीबद्दल निर्माण झालेले वाद आजही तितक्याच चवीने चघळले जात आहेत.



या कोणत्याही वादाच्या जाळ्यात न अडकता आज इतकेच म्हणायचे आहे, की गेल्या शतकात एक खराखुरा ‘महात्मा’ आपल्यात वावरत होता. तो आपणच गमावला.

बापूजींच्या पवित्र स्मृतींस श्रद्धांजली!

- भारतकुमार राऊत


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IUUYCU
Similar Posts
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
सुंदर व सत्शील दुर्गाबाई! मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
‘ल्युटिन्स’चा कर्ता ज्याला नवी दिल्ली शहराची थोडी फार माहिती व शहराच्या इतिहासाची जाण आहे, त्यांना ‘ल्युटिन्स’ परिसराची माहिती असतेच. प्रशस्त रस्ते, दुतर्फा शोभिवंत फुलझाडे, शोभिवंत चौक आणि परिसरात सुंदर टुमदार बंगले व प्रशस्त प्रशासकीय इमारती हे सारे वैभव ही भारताच्या राजधानीची शान आहे. हा भाग ज्यांनी वसवला ते कल्पक वास्तुकार एडविन ल्युटिन्स

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language